मधुकर कांबळे - लेख सूची

भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन

भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी …

पुस्तक-परिचय : पुकारा

श्री. नानक रामटेकेंनी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत काम करताना आलेले अनुभव ‘पुकारा’ या पुस्तकात लिहिले आहेत. 1965 ते 2001 ह्या 36 वर्षांच्या कालावधीत त्यांनी ज्या वेगवेगळ्या पदांवर काम केले त्यात जिल्हाधिकारी (वर्धा), आयुक्त (नागपूर महानगरपालिका) ह्या मुख्य नेमणुका आहेत. 1965 ला ते उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले व 1983 ला ते आय.ए.एस. झाले. विदर्भाच्या ग्रामीण भागात …

पुस्तक परामर्श -वस्ती

वस्ती या पुस्तकात वसंत मून यांनी नागपूरच्या बर्डी या मध्यवर्ती भागातील बौद्ध धर्मांतराच्या पूर्वीच्या महार लोकांचे जीवन चितारले आहे. हा काळ इ.स. १९३० ते १९५६ दरम्यानचा आहे. पूर्वीच्या महार लोकांची जीवनपद्धती, त्यांचे नागपंचमीसारखे सण, त्यांची सामाजिक एकी, हिंदू धर्माने त्यांच्यावर लादलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाची चीड, त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती व सदैव सतावणारी भूक, नातलगांचे कधी-आहे, कधी-नाही …

रोटी-बेटी व्यवहार सामाजिक समतेस पोषक

भारतात व बाहेरही हिंदूंची लग्ने मुख्यतः त्यांच्याच जातींमध्ये होतात. एखाददुसरे लग्न विजातीय झाले तरी त्यात अस्पृश्याचा समावेश क्वचितच असतो. अशा बेटी-व्यवहारामुळे जातिसंस्था व अस्पृश्यता जिवन्त आहे. असे विवाह सामाजिक समतेस पोषक नाहीत. भारतीय संविधानाने सामाजिक समतेचा पुरस्कार केला व अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली, त्यामुळे पूर्वी मोगलाईत, पेशवाईत व नंतर इंग्रजी राजवटीत स्पृश्य हिंदूना जे अस्पृश्य …

बौद्ध धर्माविरुद्ध बंड, मनुस्मृती व जातिसंस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात एक शोधनिबंध वाचून हिंदुसमाजातील सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ह्या प्रथा जातिव्यवस्था बळकट करण्यास्तव उत्पन्न केल्या गेल्या असे विचार मांडले होते. याचा उल्लेख कुमुदिनी दांडेकरांनी त्यांच्या सतीची चाल बालविवाह, या (आ.सु., जुलै 2003), या लेखात केला. जातिभेदामुळे भारतीय समाज पोखरून गेला, लोकांत एकीची भावना राहिली नाही व …

शिक्षणात बदल : गोरगरिबांच्या शिक्षणावर गदा

भारतात आता बदलत्या शिक्षणाच्या धोरणामुळे गरिबांचे शिक्षणच बंद होणार असे श्री. अरविंद वैद्य यांनी त्यांच्या लेखात (आ. सु., जुलै-ऑगस्ट, २००२) सांगून वाचकांचे डोळे उघडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आता भारतात समाजपरिवर्तन हा शिक्षणाचा हेतू राहिला नसून, भांडवली विषमतेची रचना मजबूत करणे हाच शिक्षणाचा हेतू होऊ लागला आहे, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण हा हेतू आजचाच नाही. …

आरक्षणाबद्दलचे गैरसमज आणि वास्तविकता

श्री दिवाकर मोहनी आपल्या लेखात (आ.सु. नोव्हेंबर, २००२) जातीनिहाय आरक्षणाचे पाऊल अर्थकारणाच्या दृष्टीने चुकीचे ठरले की काय अशी शंका घेण्यास (आज) पुष्कळ जागा आहे असे सांगून आरक्षणामुळे कोणतेही उत्पादन न करता व किंवा केलेच तर दुय्यम, तिय्यम दर्जाचे कस्न हक्क म्हणून मिळवावयाची रक्कम असे त्याला स्वरूप आले व परिणामी देशाचा नैतिक दर्जाच घसरला असे म्हणतात. …

आजचा सुधारक व आगरकरांचे विचार

भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा …

इतिहास: खरा व खोटा

(क) भारतात १९०१ पर्यन्त बसेस मध्ये अस्पृश्यांना मज्जाव भारतात १९०१ पर्यन्त अस्पृश्यांना ट्राम व बस मध्ये चढूच देत नसत. बसेस मध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळविण्यात श्री. संभाजी संतूजी वाघमारे या अस्पृश्य कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची माहिती श्री. आर. डी. गायकवाड यांनी त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या आठवणी (सुगावा प्रकाशन, पुणे ३०; सप्टेंबर १९९३) या पुस्तकात दिली आहे. त्यांच्याच शब्दांत …

डॉ. आंबेडकर पुतळा-प्रक्षालन : एक लाक्षणिक कृती

विवेकवाद वाढवावयाचा असेल तर बौद्धिक लढ्यांबरोबर लाक्षणिक कृत्यांच्या माध्यमातूनही जनजागरणाचे प्रयत्न करावयाचे असतात ह्या श्री. भा. ल. भोळे यांच्या मताशी मी सहमत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर पुतळा धुण्यामागे हेच कारण होते. आ. सु.च्या सल्लागार–मंडळातून श्री. भोळे यांना काढण्याची चूक आजचा सुधारक करणार नाही याची मला खात्री वाटते. भारताला पाकिस्तानसारख्या धार्मिक व फासिस्ट राज्यकारभाराकडे घेऊन …

पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण

आजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे. आपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी …